Swachh Survekshan 2020 Results: स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या स्थानी; 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत टॉप 3 मध्ये कराड, सासवड, लोणावळा
स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या निकालात यंदा देखील इंदौर शहर अव्वल ठरले आहे. मध्य प्रदेशातील इंदौर शहराने सलग चौथ्या वर्षी स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सकाळी वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण (Swachh Survekshan 2020) च्या पाचव्या वर्षाचे निकाल जाहीर केले. स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या निकालात यंदा देखील इंदौर (Indore) शहर अव्वल ठरले आहे. मध्य प्रदेशातील इंदौर शहराने सलग चौथ्या वर्षी स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे. गुजरात मधील सुरत (Surat) शहर दुसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्रातील नवी मुंबई (Navi Mumbai) शहराला तिसरा क्रमांक मिळाला आहे. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कराड (Karad) या शहरांने प्रथम क्रमांक मिळवाला आहे. तर पुणे जिल्ह्यातील सासवड (Saswad) शहराला दुसरा क्रमांक आणि लोणावळा (Lonavala) या शहराला तिसरा क्रमांक मिळाला आहे. पन्हाळा पाचव्या स्थानी आहे. तर जेजूरी, शिर्डी यांच्याही स्वच्छ शहरांच्या यादीत समावेश आहे.
या वर्षीचे स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे उशिरा घोषित करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण हे 28 दिवसांमध्ये करण्यात आले. दरम्यान, देशातील टॉप 10 स्वच्छ शहरांची यादी पुढील प्रमाणे:
क्रमांक | शहराचं नाव | स्कोअर |
1 | इंदौर | 5647.56 |
2 | सुरत | 5519.59 |
3 | नवी मुंबई | 5467.89 |
4 | विजयवाडा | 5270.32 |
5 | अहमदाबाद | 5207.13 |
6 | राजकोट | 5157.36 |
7 | भोपाळ | 5066.31 |
8 | छत्तीसगड | 4970.07 |
9 | जीव्हीएमसी विशाखापट्टणम | 4918.44 |
10 | वडोदरा | 4870.34 |
स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात 2016 मध्ये सरकारकडून करण्यात आली होती. मोठ्या शहरांमध्ये साफसफाईंचे प्रमाण वाढावे आणि या सर्व शहारांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी हेल्थी कॉम्पिडिशनला सुरुवात व्हावी या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. या स्पर्धेच्या प्रथम वर्षी मैसूर या शहराने पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सलग चौथ्या वर्षी देखील इंदौर शहराने बाजी मारली आहे.