Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कोणत्याही राजकीय पक्ष, नेत्याचा संबंधांचा पुरावा नाही: मुंबई पुलिस आयुक्त परमबीर सिंह

कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय व्यक्तीचा यामध्ये समावेश असण्याबाबतचा पुरावा सापडला नाही. चौकशीमधूनही अशी माहिती समोर आलेली नाही. असे म्हटलं आहे.

Mumbai Police Commissioner | Photo Credits: Twitter/ ANI

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर दिवसागणिक नवनव्या गोष्टी समोर येत असल्याने आता या प्रकारणामधील गुंतागुंत वाढत चालली आहे. दीड महिन्यापूर्वी वांद्रे येथील राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्यानंतर नेमकं त्याच्या आत्महत्येचं कारण काय असावं? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. सध्या मुंबई आणि बिहार पोलिसांकडून तपास सुरू असून त्यावरून आता राजकारण पेटायला देखील सुरूवात झाली आहे. आज (3 ऑगस्ट) मुंबई पोलिस कमिशनर परमबीर सिंह यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची माहिती देताना यामध्ये राजकीय कनेक्शन नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय व्यक्तीचा यामध्ये समावेश असण्याबाबतचा पुरावा सापडला नाही. चौकशीमधूनही अशी माहिती समोर आलेली नाही. असे म्हटलं आहे. नक्की वाचा: महाराष्ट्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोमधील तरूणी रिया चक्रवर्ती नव्हे तर दिशा पटानी; जाणून घ्या Viral Photo मागील सत्य !

परमबीर सिंह यांनी महिती देताना सुशांत हा बायपोलर डिसऑर्डरचा रूग्ण होता. त्याच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती दिली आहे. दरम्यान जितके पैलू समोर येत आहेत त्या सार्‍याची चौकशी होईल. यामध्ये व्यावसायिक संबंधांपासून, खाजगी आयुष्य, आर्थिक अफरातफर याबबातही चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांनी 56 जणांचा जबाब नोंदवला आहे. त्यापैकी एक अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील आहे. तिला दोनदा पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आहे. 16 जून दिवशी सुशांतच्या वडील, बहीण आणि मेव्हण्याचा जबाब नोंदवला होता. त्यावेळेस त्यांनी कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. दरम्यान मुंबई आणि बिहार पोलिस देखील एकजुटीने काम करत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीमध्ये सुशांतच्या खात्यातून 15 कोटी काढल्याचं सांगण्यात आले आहे. मात्र मुंबई पोलिसांना त्याच्या खात्यात 18 कोटी असल्याचं समजलं होतं. ज्यामधले 4.5 कोटी अजूनही आहेत. रियाच्या अकाऊंटमधून अद्याप व्यवहार झालेला नाही. त्याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.

सध्या महाराष्ट्र आणि बिहार मध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्येवरून राजकरण करायला देखिल सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिस सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याचं म्हटलं आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील तपास व्यवस्थित सुरू असल्याचं म्हटलं आहे.