Clean Air Survey 2024: स्वच्छ हवा गुणवत्तेच्या क्रमवारीत सुरत पहिल्या स्थानावर; जबलपू दुसरे तर आग्रा तिसऱ्या स्थानावर

ज्यात गुजरातमधील सुरत शहराने भारतातील स्वच्छ हवेच्या गुणवत्तेच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तर, मध्य प्रदेशमधील जबलपूर शहराने दुसरे तर उत्तर प्रदेशमधील आग्रा शहराने तिसरे स्थान पटकावले आहे.

Photo Credit- Pixabay

Clean Air Survey 2024: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शनिवारी जयपूर येथे 'स्वच्छ हवा आंतरराष्ट्रीय दिवस' स्मरणार्थ राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते, ज्यात स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024(Clean Air Quality Ranking) दरम्यान 'राष्ट्रीय स्वच्छ हवा शहरे' पुरस्कार प्रदान करण्यात आले. या अंतर्गत 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सुरतला अव्वल, जबलपूरला दुसरे आणि आग्राला तिसरे स्थान मिळाले आहे. (हेही वाचा:Air Pollution in India: वाढते वायू प्रदूषण भारतासाठी आव्हान; देशातील 10 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता घसरल्याने दरवर्षी सुमारे 33,000 मृत्यू )

तर, तीन लाख ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये फिरोजाबाद (उत्तर प्रदेश), अमरावती (महाराष्ट्र) आणि झाशी (यूपी) ही शहरे सर्वोत्तम मानली गेली. तर तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रायबरेली (उत्तर प्रदेश), नलगोंडा (तेलंगणा) आणि नालागढ (हिमाचल प्रदेश) ही शहरे पहिल्या क्रमांकावर आहेत. 'स्वच्छ हवा सर्वेक्षण' हा शहरी कृती योजनेअंतर्गत मंजूर उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत समाविष्ट असलेल्या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेवर आधारित शहरांची क्रमवारी लावण्याचा एक उपक्रम आहे.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध सर्वोत्तम पद्धतींद्वारे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा केल्याबद्दल या शहरांना पुरस्कार देण्यात आला. यात रस्ते पक्के करणे, यांत्रिक साफसफाईला चालना देणे, जुन्या कचऱ्याचे बायोरिमेडिएशन, घनकचरा व्यवस्थापन, डंपसाइट्स असलेल्या जमिनीचे स्वच्छ जागेत रूपांतर करणे, हरित पट्टा विकास, वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि मियावाकी वनीकरण यांचा समावेश आहे. भारताने 2019 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायु सर्वेक्षण (NCAP) लाँच केला. ज्यामध्ये 2024 पर्यंत कण प्रदूषण 2030 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.