Pune: मुल प्राप्तीसाठी काळी जादू करत करायचा छळ, सासऱ्याविरोधात सुनेने केला एफआयआर दाखल
रिअल इस्टेट डेव्हलपरच्या (Real Estate Developer) दोन मुलांशी लग्न झालेल्या दोन बहिणींनी दिलेल्या स्वतंत्र तक्रारीच्या आधारे पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) त्यांचे पती, सासरे आणि काळी जादू करणाऱ्या एका व्यक्तीवर छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रिअल इस्टेट डेव्हलपरच्या (Real Estate Developer) दोन मुलांशी लग्न झालेल्या दोन बहिणींनी दिलेल्या स्वतंत्र तक्रारीच्या आधारे पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) त्यांचे पती, सासरे आणि काळी जादू करणाऱ्या एका व्यक्तीवर छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलांनी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) दोन एफआयआर दाखल केले आहेत. दोन समान एफआयआरनुसार, दोन्ही बहिणी उंड्री (Undri) येथील रहिवासी आहेत. पती आणि सासरच्या मंडळींकडून वेगवेगळ्या प्रसंगी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ (Harassment) होत असल्याचा आरोप आहे. हेही वाचा Crime: सुरक्षा कंपनीच्या व्यवस्थापकाला महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक
आरोपींनी दोन तक्रारदार महिलांवर काही 'काळी जादू' केली, जेणेकरून त्या पुरुष मुलांना जन्म देऊ शकतील असाही आरोप आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, कोथरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब बधे तपास करत आहेत.