Sudhakar Shinde Martyred: नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नांदेडचे सुपुत्र सुधाकर शिंदे शहीद
आयटीबीपीने ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.
छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) नक्षलवाद्यांनी (Naxal Attack) केलेल्या भ्याड हल्लात नांदेडचे सुपुत्र आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. आयटीबीपीने ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात करियामेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेलेल्या इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर नक्ष बेछुट गोळीबार केला. दरम्यान, नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देताना भारताचे दोन जवान शहिद झाले आहेत. आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर यांच्यासह एएसआय गुरुमुख सिंह यांनी देशासाठी बलिदान दिले आहे.
शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास नक्षलवद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून 600 मीटर अंतरावर असताना जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर त्यांनी हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांची शस्रही लुटून नेली. एक एके 47 रायफल, 2 बुलेटप्रुफ जॅकेट आणि वॉकी टॉकी नक्षलवाद्यांनी लुटल्याची माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- Diksha Shinde: औरंगाबादची कन्या दीक्षा शिंदेला मोठे यश, नासाच्या एमएसआय फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड
ट्वीट-
आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांना नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच सोशल मीडियावर शहिद सुधाकर शिंदे अमर रहे, अशा घोषणा सुरु आहेत.