Nashik Accident: नाशिकमध्ये बसला अपघात, विद्यार्थ्यांसह 15 प्रवासी जखमी

या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Accident (PC - File Photo)

नाशिक जिल्ह्यातील अपघाताचे सत्र अद्याप थांबत नाही आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास बसचा अपघात झाला. या भीषण अपघातात सुमारे 15 जण हे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार हे सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. (हेही वाचा - Maratha Reservation Protest In Jalna : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली; सलाईन लावत आंदोलन सुरू)

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जामदरी शिवारात जामदरी पांझण चौफुलीवर मळगाव नांदगाव बसचे पाटे तुटल्याने अपघात झाला. या अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला नाल्यात गेली. या बस मधील सुमारे 14 ते 15 शाळकरी मुले व प्रवासी जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या बस मधील सुमारे 14 ते 15 शाळकरी मुले व प्रवासी जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमी प्रवाशांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.