शाळेत फटाके फोडण्यास दिला नकार, शिक्षकाला मारहाण

शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी फटाके फोडण्यास नकार दिल्याने चक्क शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

शाळेत फटाके फोडण्यास दिला नकार, शिक्षकाला मारहाण
फोटो सौजन्य- Pixabay
शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी फटाके फोडण्यास नकार दिल्याने चक्क शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तर आरोपी विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
यवतमाळमधील फ्री मेथाडीस्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही घटना शनिवारी घडली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत फटाके फोडले. मात्र त्यावेळी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी त्यांना फटाके फोडण्यास नकार दिल्याने विद्यार्थाने शिक्षकाला मारहाण केली आहे.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक शाळेत येऊन पोहचले. तसेच काही पालकांमध्ये या विद्यार्थ्यांच्या वागण्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2018 01:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).