Ahmednagar News: अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक

वंचित बहुजन आघाडी(vanchit bahujan aaghadi)च्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.

Photo Credit -X

Ahmednagar News: राज्यासह देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. मात्र, त्याआधीच अहमदनगरमध्ये राजकीय वातावरण ढळवणारी घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडी(vanchit bahujan aaghadi)च्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक (Stones pelted) करण्यात आली आहे. उत्कर्षा रूपवते या वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. या दगडफेकीत वाहनाचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने या घटनेत उत्कर्षा रूपवते(utkarsha rupwate) यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ काल सोमवारी (ता. ६) रात्रीच्या सुमारास घटना घडली. या घटनेनं अहमदनगरमध्ये राजकीय वातावरण तापन्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्कर्षा रूपवते या आपला प्रचार दौरा आटोपून सोमवारी रात्री कारने संगमनेरकडे परतत होत्या. त्यावेळी ही घटना घडली असल्याची सांगितले जात आहे. रात्री अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ त्यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी कारवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. समोरील प्रसंग पाहून कारचालकाने सतर्कता दाखवत कार न थांबवता तशीच रेठली. त्यामुळे या हल्ल्यातून उत्कर्षा रूपवते थोडक्यात बचावल्या.

यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आला होता का? याबाबत अनेक चर्चा रंगत आहे. दरम्यान, याप्रकरणी उत्कर्षा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.