Pune Bribe Case: राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला लाच घेतल्याप्रकरणी केली अटक
एसीबीने आरोग्य निरीक्षकाच्या (Health inspector) सहाय्यकालाही लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुणे महानगरपालिकेच्या (PMC) आरोग्य निरीक्षकाला कचरा संकलन वाहन चालकाकडून मासिक 5,000 रुपयांची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी अटक (Arrested) केली आहे. एसीबीने आरोग्य निरीक्षकाच्या (Health inspector) सहाय्यकालाही लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. स्वप्नील कोठावळे असे अटक करण्यात आलेल्या आरोग्य निरीक्षकाचे नाव असून प्रकाश वाघचौरे असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे येरवडा (Yerawada) परिसरात पीएमसीसाठी कचरा संकलनाचे वाहन चालवतात. हेही वाचा MSRTC Workers Strike: मागण्या दुर्लक्षित राहिल्यास MSRTC आंदोलन तीव्र करू, रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा इशारा
एसीबीच्या अधिका-यांनी सांगितले की, कोठावळे याने तक्रारदाराकडे वाहन चालू ठेवण्यासाठी मासिक 5,000 रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. कोठावळे यांनी केलेल्या मागणीची पडताळणी करून गुरुवारी एसीबीने सापळा रचला.वाघचौरे याला ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर कोठावळे यांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.