Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2018: महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुनायींसाठी BEST बस, रेल्वेच्या विशेष सुविधा

दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबेडकर अनुनायींसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Photo Credits: Wikipedia Commons)

Dr.Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2018 : 6 डिसेंबर हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din). डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्याचबरोबर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. दलितांना त्यांचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले. त्यामुळेच त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक भीम अनुनायी आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीला भेट देतात. या भीम  अनुनायींसाठी दरवर्षी BEST बस आणि रेल्वेकडून विशेष सुविधा देण्यात येतात. यंदाही विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष मेसेज, Whats App स्टेट्स

विजेची सोय

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, राजगृह, आंबेडकर कॉलेज यांसारख्या ठिकाणी 301 अतिरिक्त लाईट्सची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर दादर चौपाटी, महापौर निवास आणि ज्ञानेश्वर उद्यानात 3 सर्च लाईट्स लावण्यात आल्या आहेत. तसंच बीएमसी द्वारा लावण्यात आलेल्या मंडपातही अतिरिक्त वीजसेवा पुरविण्यात येणार आहे.

अतिरिक्त बस सेवा

दादर स्टेशन ते शिवाजी पार्कपर्यंत 4 ते 7 डिसेंबरपर्यंत 24 तास अतिरिक्त बससेवा सुरु करण्यात आली आहे. बोरीवली ते कान्हेरी गुंफा, मालाड ते मार्वे, बोरिवली ते गोराई खाडी पर्यंत ही अतिरिक्त बससेवा देण्यात येणार आहे. 5 डिसेंबरच्या रात्री 8:30 वाजल्यापासून वडाळा डेपो ते मालवणी डेपो, मुंबई सेंट्रल डेपो ते टाटा बिजली केंद्र आणि रा.ग. गडकरी चौक ते कन्नमवार नगरपर्यंत ही बससेवा उपलब्ध असेल. विशेष बसेस सोबतच मॅजिक पासची ही सोय करण्यात आली आहे. हा पास शहरी प्रवासासाठी 50 रुपये, उपनगरीय प्रवासासाठी 60 रुपये आणि संपूर्ण प्रवासासाठी 90 रुपये असा असेल. या विशेष पास साठी ओळखपत्राचीही आवश्यकता लागणार नाही.

जादा रेल्वे लोकल

5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर दादर-ठाणे लोकल 1.15 मिनिटांनी सुटेल. त्यानंतर दादर-कल्याण 2.25, दादर-कुर्ला 3.00, कुर्ला-दादर 12.45, कल्याण-दादर 1.00, ठाणे-दादर 2.10 वाजता सुटेल. हार्बर लाईनवर मध्यरात्री कुर्ला-मानखुर्द ही लोकल 2.30 मिनिटांनी सुटेल. त्यानंतर कुर्ला-पनवेल 3.00, कुर्ला-वाशी 4.00, वाशी-कुर्ला 1.30, पनवेल-कुर्ला 1.40, मानखुर्द-कुर्ला 3.10 मिनिटांनी सुटेल.

मुंबई दर्शन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींसाठी विशेष मुंबई दर्शन बसची व्यवस्था करण्यात आली आहे. याचे भाडे 150 रुपये असेल. शिवाजी पार्क येथून सुटणारी ही बस राजगृह, आंबेडकर महाविद्यालय, सिद्धार्थ विद्यालय, आंबेडकरी स्मारक, मंत्रालय, विधानभवन, गिरगाव चौपाटी, हाजीअली, दूरदर्शन, सिद्धीविनायक मंदिर, प्लॉझा यांसारख्या ठिकाणी जाईल.