मुंबई: ससून डॉक येथील भंगार गोदामाला लागलेली आग विझवण्यात 2 तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला यश

अग्निशमन दलाला मात्र कठोर परिश्रम घेऊन संपूर्ण 2 तासाच्या सलग प्रयत्नानंतर ही आग मिटवण्यात यश आल्याचे समजत आहे

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

दक्षिण मुंबई (South Mumbai) तील ससून डॉकजवळील (Sasoon Dock) भागात असणाऱ्या एका भंगार गोदामाला काल शुक्रवार, 8 फेब्रुवारी रोजी भीषण आग (Fire) लागली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाला मात्र कठोर परिश्रम घेऊन संपूर्ण 2 तासाच्या सलग प्रयत्नानंतर ही आग मिटवण्यात यश आल्याचे समजत आहे. दरम्यान, आग कशामुळं लागली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. ठाणे: अंबरनाथ मधील मोरीवली औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याला आग

प्राप्त माहितीनुसार, ससून डॉकजवळ हे दोन मजली भंगार गोदाम आहे. मध्यरात्री 1. 45 वाजताच्या सुमारास या गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमनचे चार बंब आणि पाण्याचे टँकर घेऊन कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तब्बल सव्वा दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले. सुदैवावाने या आगीत कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही,

दरम्यान, मुंबईत आगीच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे. काहीच दिवसांपूर्वी कुर्ला येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती, यात आसपासच्या रहिवाशी चाळींचा मोठा भाग जाळून खाक झाला होता, तर त्या पाठोपाठच दोन दिवसांपूर्वी चिंचपोकळी येथे अभ्युदयनगर परिसरात एका गोदामाला आग लागली होती.