दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक- शरद पवार
'आमच्या घामाची किंमत द्या' हे एवढेच मागणे त्या शेतक-यांचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत विचार करावा असे ते म्हणाले.
कृषी कायद्याविरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला (Farmers Protest in Delhi_ बदनाम करणारे हे सत्ताधारी पक्षातील काही घटक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. शरद पवार आज सोलापूर दौ-यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनावर ते बोलत होते. 'आमच्या घामाची किंमत द्या' हे एवढेच मागणे त्या शेतक-यांचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत विचार करावा असे ते म्हणाले.
"शेतकरी आपल्या मागणीसाठी गेले अडीच महिने दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. किमतीच्या संदर्भात केंद्र सरकारने धोरण नीट आखावं अशी त्यांची मागणी आहे. आम्हाला फुकट काही नको, आमच्या घामाची किमंत द्या असं त्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी कुठेही कायदा हातात घेतला नाही." असे शरद पवार म्हणाले.हेदेखील वाचा- Sharad Pawar And Sushil Kumar Shinde on Stage: शरद पवार यांना द्राक्षं भरवल्यावर सुशील कुमार शिंदे यांनी सांगितली राजकारणातील एण्ट्रीची कहाणी
दरम्यान सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहिले होते. त्यावेळी सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते. ड्रोनच्या माध्यमातून द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा पार पडण्यात आला.
"राज्यात काम करत असताना मी पुण्याचा कधी पालकमंत्री नव्हतो, मात्र सोलापूरचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. शेतीच्या क्षेत्रात क्रांती करणार गाव म्हणून नान्नजची ओळख आहे. माझ्याकडे शेती खात जेव्हा होत तेव्हा कमी पाण्यात येणार पीक म्हणून डाळींबचे संशोधन केंद्र सोलापुरात उभं केलं." असं देखील शरद पवार यावेळी आर्वजून म्हणाले.