सोलापूर: भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी गोत्यात; जातीचा खोटा दाखला देत निवडणूक लढवल्याच्या आरोप

जयसिद्धेश्वर स्वामी (Dr. Jaisiddheshwar Swami) यांचे जात प्रमाणपत्र बनावटी असल्याच्या तक्रारीवर येत्या तीन ते चार दिवसात अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्यास त्यांना खासदारकीवर पाणी सोडावे लागू शकते

Dr. Jai Siddheshwar Swami | (Photo Credit : Facebook)

भाजप (BJP) सोलापूरचे (Solapur) खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी (Dr. Jaisiddheshwar Swami) यांचे जात प्रमाणपत्र बनावटी असल्याच्या तक्रारीवर येत्या तीन ते चार दिवसात अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. सोलापुरात जात पडताळणी समितीकडून या तक्रारीची दखल घेत सुनावणी पार पडली. सोलापूर आरक्षित लोकसभा मतदारसंघासाठी जयसिद्धेश्वर स्वामी यांनी बेडा जंगम या जातीचा दाखला सादर करत निवडणूक लढवली होती. पण हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.जयसिद्धेश्वर यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीसाठी जयसिद्धेश्वर स्वामींनी बेडा जंगम जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. पण त्यांचे मूळ प्रमाणपत्र हिंदू लिंगायत असल्याचे याचिकाकर्त्यांनी आरोपात म्हंटले आहे.

रोहित पवार यांच्याविरुद्ध राम शिंदेंनी दाखल केली याचिका; न्यायालयाने समन्स बजावत दिला 13 फेब्रुवारीपर्यंत मत मांडण्याचा आदेश

प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणी दक्षता समितीला नियुक्त करून त्यांच्याकडून अहवाल मागवून घेण्यात आला होता. या अहवालात खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुराव्यांसाठी दाखल केलेला दाखलाही संशयास्पद असल्याचे समितीने म्हंटले आहे. या प्रकरणात जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्यास त्यांना खासदारकीवर पाणी सोडावे लागू शकते. सोलापूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इतर जातीच्या उमेदवाराने निवडणूक लढविल्यास ती अवैध ठरेल हे निश्चित आहे.

दरम्यान, दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून तिसऱ्या समिती मार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या वकिलाने केली होती मात्र जिल्हा जात पडताळणी समितीने हा अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र दक्षता समितीचा अहवाल मान्य नसून याविरोधात हायकोर्टात जाणार असे वकील संतोष नाव्ह्कर यांनी सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif