IPL Auction 2025 Live

Corona Devi Mandir: सोलापुर च्या बार्शी मध्ये उभारलं कोरोना देवी मंंदिर (Watch Video)

वृत्त वाहिन्यांंच्या माहितीनुसार, बार्शी मध्ये पारधी वस्तीत चक्क कोरोनाच्या देवीचंं मंंदिर उभारण्यात आलं आहे.

Corona Devi Temple (Photo Credits: Youtube Screengrab)

Corona Devi Temple In Solapur: कोरोनामुळे (Coronavirus) महाराष्ट्रात लॉकडाउन (Lockdown In Maharashtra) लागु झाल्यावर सर्वाधिक गर्दीची ठिकाणे म्हणजेच मंंदिरे (Temples) बंंद करण्यात आली. अलिकडे हीच मंंदिरे उघडण्यासाठी राज्यात घंंटानाद आंदोलने सुद्धा झाली. मात्र आता कोरोनामुळे मंंदिरं बंंद झाली ना मग आता आम्ही या कोरोनाचंच नवंं मंंदिरं उभाणार असा निश्चय सोलापुर (Solapur) च्या बार्शी (Barshi)  येथे पारधी समाजाने केला आहे. वृत्त वाहिन्यांंच्या माहितीनुसार, बार्शी मध्ये पारधी वस्तीत चक्क कोरोनाच्या देवीचंं मंंदिर उभारण्यात आलं आहे. कोरोना ही देवी आहे, इतकंंच नव्हे तर ती नवजवान तरुणी आहे तिला तिचा मान न मिळाल्याने तिचा असा कोप झालाय म्हणुन आता तिला खुश करण्याची गरज आहे अशी भावना या भागातील महिलांंनी बोलुन दाखवली. याच समजुतीतुन या महिला त्यांंच्या कोरोना देवीला कोंंबड्या बकर्‍यांंचा बळी दिला जात आहे.

सोलापुर मधील कोरोना देवीचे मंंदिर हे सध्या अगदी साध्या स्वरुपात आहे. या महिलांंनी बहुधा काही दगडे आणुन त्यांंची प्रतिष्ठापना केलीये. ज्याची त्या पुजा करतात, त्याला कोंंबड्या, बकर्‍यांंचा नैवेद्य दाखवतात, आणि तुझा मान घेउन तु जा अशी विनंंती या देवीकडे करत असतात. सोलापूर: पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदीर भाविकांसाठी खुलं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन; पोलिसांकडून नाकाबंदी, चोख बंदोबस्त

कोरोना देवीचं मंंदिर

दरम्यान, या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंं असेल की कोरोना देवीचं मंंदिर उभारणार्‍या या महिलांंना आपला हा प्रकार लोकंं चुकीचा आहे असे म्हणतील याचीही कल्पना आहे मात्र कोण काहीही म्हणु दे आपण आपली पुजा करत राहणार असे त्यांंनी ठरवले आहे, एका दृष्टीने यामागील भावना कोरोना संंपावा अशीच असली तरी त्यासाठी अंधश्रद्धेचा हा मार्ग नक्कीच आपल्या विचारांवर प्रश्न निर्माण करणारा आहे.