SIT For Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार
आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच गठित करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी राज्यात अनेक ठिकणी आंदोलने करण्यात आली होती. यादरम्यान राज्यातील काही ठिकाणी या आंदोलनावेळी हिंसाचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर त्या हिंसाचाराच्या चौकशीची मागणी करण्यात येत होती. विधानसभेच्या अधिवेशनात देखील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. (हेही वाचा - Maratha Aarakshan Protest: महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस)
आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख हे संदिप कर्णिक (भापोसे), पोलीस आयुक्त, नाशिक शहर हे असणार आहेत. या एसआयटीकडून आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमागे कोण आहे? तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला का? चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या गेल्या का? याचा शोध घेतला जाणार आहे.
तसेच या एसआयटी चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच या पथकाला तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचे आणि आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याचे अधिकार असणार आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले होते. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत.