Prarthana Behere: उदगीरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख, संतप्त नागरिकांनी फाडले बॅनर; अभिनेत्रीने मागितली माफी

शहरात गावातगावत शिवजन्मोत्सवानिमित्त सांस्कृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Prarthana Behere PC TWitter

Prarthana Behere: काल राज्यभरात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. शहरात गावातगावत शिवजन्मोत्सवानिमित्त सांस्कृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लातूनमधील एका कार्यक्रमात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. कार्यक्रमाथ अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची उपस्थिती होती. त्यावेळी तिने संबोधन करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता.त्यामुळे शिवप्रेमींना ही गोष्ट खटकली. (हेही वाचा- भूमीच्या हॉलीवूड प्रवासाला लवकरच होणार सुरुवात, भक्षकनंतर मिळाली मोठी संधी

मिळालेल्या माहितीनुसार, लातुरमधील उदगीर येथे एका मॉसच्या उध्दाटनासाठी प्रार्थना बेहेरेने उपस्थिती दाखलवली. यावेळी उध्दाटनादरम्यान शुभेच्छा देत असताना, तीने तीन ते चार वेळा महारांच्या एकेरी शब्दात उल्लेक केला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, त्यानंतर शिवभक्तांकडून तिचा निषेध करण्यात आला आहे. शहरात लावण्यात आलेले अभिनेत्रीचे बॅनर फाडण्यात आले आहे. प्रार्थनाने माफि मागावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

एकेरी उल्लेख केल्यानंतर प्रार्थनाने सोशल मीडियावर माफी मागिलती आहे. तीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तीने शिवभक्तांची माफी मागितली आहे.  व्हिडिओत तीनं म्हटले आहे की,"आज मी उदगीर येथे किसान मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्या बद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif