Sindhudurg Chipi Airport Inauguration: आदित्य ठाकरे माझ्यासाठी 'टॅक्स फ्री' त्यांना माझ्या शुभेच्छा- नारायण राणे

मी मुंबईत होतो. शिवसेना प्रुमख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) मला म्हणाले तू कोकणात जा. तिथे तुला मागणी आहे. मी कोकणात आलो आणि काम सुरु केले. उद्धवजी मी हे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो. आत्मसात केले. मी मुख्यमंत्री असताना जे केले त्याचे सगळे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे.

Narayan Rane | Photo Credits: Facebook)

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे माझ्यासाठी 'टॅक्स फ्री' आहेत. माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांनी चांगले काम करावेत, असे उद्गार केंद्रीय मंत्री नारायण ( Narayan Rane) यांनी काढले. ते चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलत होते. या वेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, कोकणामध्ये मी 1990 पासून आहे. मी मुंबईत होतो. शिवसेना प्रुमख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) मला म्हणाले तू कोकणात जा. तिथे तुला मागणी आहे. मी कोकणात आलो आणि काम सुरु केले. उद्धवजी मी हे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो. आत्मसात केले. मी मुख्यमंत्री असताना जे केले त्याचे सगळे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे.

आजच्या कार्यक्रमासाठी यावं चिपी विमानतळावरुन उडणारे विमान डोळे भरुन पाहावे या स्तुत्य हेतूने मी आलो. या कार्यक्रमाबाबत कोणतेही राजकारण करायचे नाही हाच हेतू बाळगून मी आलो आहे, अशी सुरुवात करताना नारायण राणे यांनी इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केले. चिपी विमानतळाचे आज उद्घाटन झाले. पण विमानतळावर उतरल्यानंतर लोकांनी पाहायचं काय? खड्डे? विमानतळाचे उद्घाटन म्हटल्यावर रस्ते कसे चकाचक असायला हवे होते. पण तसे घडले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले लोकप्रतिनिधी काय काम करतात हे जाणून घेण्यासाठी कोणाला तरी नेमायला हवे, असेही नारायण राणे म्हणाले. आमचा भगवा आणि काम सुरु करा असे कोणी म्हटले? चिपी विमानतळाला विरोध करणारे आज मंचावर उपस्थित आहेत, असा टोलाही नारायण राणे यांनी या वेळी लगावला. (हेही वाचा, Sindhudurg Chipi Airport Inauguration: 'पायगूण असावा लागतो', उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा नारायण राणे यांना टोला)

चिपी विमानतळाचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामसादस आठवले उपस्थित होते. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराधित्य सिंधिया हे ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमास उपस्थित होते. याशिवाय विविध प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षाचे नेतेही उपस्थित होते.