IPL Auction 2025 Live

Sindhudurg Chipi Airport Inauguration: 'पायगूण असावा लागतो', उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा नारायण राणे यांना टोला

त्यावरुन काही लोकांनी टीकाही केली. पण, शेवटी काय आहे. पायगूण असावा लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाणे हा पायगूण पाहायला मिळाला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावला. दसाई यांनी कंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावल्याची चर्चा उपस्थितांमध्ये पाहायला मिळाली.

Subhash Desai | (Photo Credits: Twitter)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे ( Sindhudurg Chipi Airport Inauguration) आज (9 ऑक्टोबर) उद्घाटन झाले. आजपासून कोकणातील जनतेचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष सुरु झाला असे मानायला हकरत नाही. चिपी विमानतळ (Chipi Airport) उद्घाटनाचा क्षण येण्यास बराच वेळ लागला. त्यावरुन काही लोकांनी टीकाही केली. पण, शेवटी काय आहे. पायगूण असावा लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या रुपाणे हा पायगूण पाहायला मिळाला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी लगावला. दसाई यांनी कंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना नामोल्लेख टाळत टोला लगावल्याची चर्चा उपस्थितांमध्ये पाहायला मिळाली. चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी प्रास्ताविक करताना सुभाष देसाई बोलत होते.

चिपी विमानतळाचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामसादस आठवले उपस्थित होते. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराधित्य सिंधिया हे ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमास उपस्थित होते. याशिवाय विविध प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षाचे नेतेही उपस्थित होते. (हेही वाचा, Sindhudurg Chipi Airport: चिपी विमानतळा लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे आज एकाच मंचावर)

सुभाष देसाई यांनी या वेळी बोलताना सांगितले की, आज चिपी विमानतळाच्या माध्यमातून आज कोकणात जगभरातील लोक येती. हे विमानतळ नागरिकांसाठी लवकर उपलब्ध व्हावेयासाठी शिवसेना खासदार विनय राऊत यांनी कठोर प्ररिश्रम केले. प्रत्येक महिन्यात ते एखादी बैठक घेत असत आणि हा कार्यक्रम मार्गी कसा लागेल हे पाहात असत. खरं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पायगुणामुळेच आज या विमानतळाचे उद्घाटन होत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकदा पाठिमागे बोलताना उद्धव ठाकरे यांचा पायगुण चांगला नाही. ते मुख्यमंत्री झाले आणि कोरोना महामारी आली. त्यामुळे ते पांढऱ्या पायाचे आहेत का हे पाहायला पाहिजे असे म्हटले होते. नारायण राणे यांच्या पाठिमागच्या वक्तव्यांवरुनच सुभाष देसाई यांनी टोला लगावल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी पाहायला मिळत होती.