Siddhivinayak Mandir Dress Code: सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता जारी होणार ड्रेसकोड

सिद्धीविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी येत असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले.

Siddhivinayak Mandir Dress Code: सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता जारी होणार ड्रेसकोड
Photo Credit - ANI / FB

Siddhivinayak Mandir Dress Code:  मुंबई मध्ये गणेशभक्तांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरामध्ये (Siddhivinayak Ganapati Temple) आता दर्शनाला जायचं असेल तर ड्रेसकोड (Dress Code) लागू झाला आहे. सिद्धीविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी या निर्णयाबद्दलची माहिती दिली आहे. श्री सिद्धिविनायक मंदिरात 1 फेब्रुवारीपासून माघी गणेश जयंतीचा उत्सव सुरू होत आहे. गणेश जयंती साजरी करण्याबाबत मंदिर प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  (पाहा पोस्ट -  Pandharpur Vitthal Rukmini Darshan: नवदांपत्यांना थेट दर्शन ते स्थानिकांच्या दर्शन वेळेमध्ये वाढ; पहा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लागू झटपट दर्शनासाठी नव्या सोयी)

मंदिर प्रशासनाच्या बैठकीत भाविकांच्या ड्रेस कोडबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही महिला किंवा पुरूष हाफ पँट घालून मंदिरात येणार नाही. जर तुम्ही लहान कपडे घालून आलात तर प्रवेश दिला जाणार नाही.

पाहा व्हिडिओ -

 

सिद्धीविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी येत असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले. यानंतर आता हा ड्रेस कोडचा निर्णय हा लागू करण्यात आला आहे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).