Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: गुंड प्रवृत्तीचे लोक असं वागत असतील तर ते योग्य नाही..., श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल

निवडणुकीच्या काळात जर त्यांना यातून काही साध्य करायचं असेल तर ते त्यांनी विसरुन जावं, त्यांच्या चुकीचं समर्थन भाजपनंही केलेलं नाही. उलट युतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक जागेसाठी इथं युतीतील नेते तळमळीनं काम करत आहेत, असंही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

Srikant Shinde (Photo Credit - Twitter)

खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या माध्यमांशी बोलताना त्यांच्या नावाची घोषणा केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार लढणार हा प्रश्न ऐरणीवर होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केलीय.  कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांची लढणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी थेट गणपत गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (हेही वाचा -  Loksabha Election 2024: श्रीकांत शिंदेची कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर; 'भाजपाच्या हाती रिमोट', सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका)

भाजपचे नेते गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदेंसाठी आपण काम करणार नाही, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडं पाठवला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, त्यामुळं त्यावर जास्त बोलणं योग्य नाही. पण ज्यांचा (गणपत गायकवाड) पर्सनल अजेंडा असेल तर तो त्यांनी वैयक्तिक राबवला पाहिजे पक्षाचं नाव घेऊन नाही. असे श्रीकांत शिंदे म्हणाले.  पक्षाचं नाव घेऊन युतीचं नाव खराब करण्याचं काम त्यांनी करु नये. गुंड प्रवृत्तीचे लोक असं वागत असतील तर ते योग्य नाही. हे असं का वागत आहेत? मतदारसंघाचा विकास केलेला नाही का? तर झालेला आहे. असेही ते म्हणाले.

निवडणुकीच्या काळात जर त्यांना यातून काही साध्य करायचं असेल तर ते त्यांनी विसरुन जावं, त्यांच्या चुकीचं समर्थन भाजपनंही केलेलं नाही. उलट युतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक जागेसाठी इथं युतीतील नेते तळमळीनं काम करत आहेत, असंही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement