'अवनी'ला मारण्याचा उद्देश नव्हता, स्वसंरक्षणातून तिच्यावर गोळी झाडली- नवाब अजगरअली

पण.....

शूटर नवाब अजगरअली (Photo Credit : ANI)

अवनी वाघिणीला ठार केल्यामुळे देशाभरातून संपात व्यक्त केला जात आहे. पण यावर शिकारी शआफत अली खान यांचा मुलगा नवाब अजगर अलीने स्पष्टीकरण दिले आहे. अवनी वाघिणीला आम्हाला ठार करायचे नव्हते. पण वन खात्याच्या अधिकाऱ्याने जेव्हा तिच्यावर ट्रँक्विलाईज टार्टने निशाणा साधला. त्यावेळी ती उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनाच्या दिशेने झेपावली. तेव्हा स्वसंरक्षणासाठी तिच्यावर गोळी झाडल्याचे नवाब अजगर अलीने सांगितले.

अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर देशभरातून टीका केली जात होती आणि शआफतअली खान आणि त्यांचा मुलगा नवाब अजगरअली हे वादात अडकले होते. पण अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतर त्यांनी आपली बाजू मांडली.

नवाब अजगरअली पुढे म्हणाला की, "गेल्या 2 वर्षांमध्ये अवनीला 5 वेळा ट्रँक्विलाईज करण्यात आले होते. पण ती शांत झाली नाही. म्हणून गावकऱ्यांना ती दिसताच तिच्या हल्ल्यात कोणाचा बळी जावू नये म्हणून आम्ही लगेचच त्या ठिकाणी दाखल झालो आणि ट्रँक्विलाईज टार्टने तिच्यावृर निशाणा साधला. पण त्याने अधिकच उत्तेजित होऊन ती आमच्या दिशेने झेपावली. मी स्वरक्षणासाठी तिच्यावर गोळी झाडली."

मेनका गांधींनी देखील अवनी मृत्यू प्रकरणावर जोरदार टिका केली. सोशल मीडियावरही अवनीला न्याय मिळवून देण्यासाठी #जस्टीसफॉरअवनी हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. प्राणी प्रेमींनीही हा घटनेचा निषेध केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची दखल घेत याची खोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.