Police Constable Death: धक्कादायक! लोकल ट्रेनमधून पडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोपर रेल्वे स्थानकावरील घटना

कधी काय होईल याचा काही नेम नाही. दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली.

Police Death PC INSTA

Police Constable Death: रेल्वेतून प्रवास करणं हा कधीही धोकादायकच असू शकतो. कधी काय होईल याचा काही नेम नाही. दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. ज्यामुळे मुंबई शहर हादरली आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करताना प्रचंड गर्दी मुळे दरवाज्यात उभा असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा  खाली पडून मृत्यू झाला आहे. ही घटना कोपर रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. (हेही वाचा- बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याच्या रागात 24 वर्षीय तरूणावर 4 वेळा कार घालत घेतला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित रमेश किळजे (वय वर्ष 25) असं मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो बुधवारी नेहमी प्रमाणे, कामाला जात होता. ताडदेव येथे पोलिस कार्यलयात कार्यरत होता. डोंबिवलीतून भरगच्च लोकल ट्रेनला चढला आणि दरवाज्यात उभा राहिला. ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की, दरवाज्यात उभा असलेल्या रोहितचा तोल गेला आणि भरधाव ट्रेनमधून खाली पडला. जमिनीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला.

रोहित डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंट येथील रहिवासी होता. वडिलांच्या अकास्मिक मृत्यूनंतर नंतर 2018 रोजी रोहित अनुकंप तत्वावर कामाला रुजी झाला. रोहितच्या पाश्चात त्याची छोटी बहीण आणि आई आहे. बुधवारी सकाळी 7 वाजून 41 मिनीटांनी डोंबिवलीहून निघालेल्या जलद लोकलने दादरकडे निघाला होता. लोकल ट्रेनला गर्दी खूप होती. रोहितचा हात सुटल्याने तो थेट जमिनीवर कोसळला.