धक्कादायक! Thane येथे 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वडिलांचा व प्रियकराचा बलात्कार; आरोपींना अटक, गुन्हा दाखल

आता महाराष्ट्रातील ठाणे (Thane) येथे एका 17 वर्षाच्या मुलीवर तिच्या वडिलांनी (Father) आणि प्रियकराने (Boyfriend) बलात्कार केला

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit:- File photo)

आजकाल बलात्काराच्या (Rape) इतक्या विचित्र घटना वाचनात येत आहे की, यामुळे समाजात ही विकृती किती मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे हे लक्षात येते. आता महाराष्ट्रातील ठाणे (Thane) येथे एका 17 वर्षाच्या मुलीवर तिच्या वडिलांनी (Father) आणि प्रियकराने (Boyfriend) बलात्कार केला आणि त्यानंतर ही मुलगी गरोदर राहिली. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. दोन्ही आरोपी, पीडितेचे वडील (51), जे शालेय शिक्षक म्हणून काम करतात आणि तिचा 21 वर्षीय प्रियकर यांना सोमवारी पहाटे अटक करण्यात आली.

तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील वसिंद टाऊन येथे पोलिसांना रस्त्याच्या कडेला मृत गर्भ आढळला होता. सहायक पोलिस निरीक्षक योगेश गुरव यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, गर्भ या 17 वर्षीय पीडित मुलीचा असल्याचे समजले. चौकशीदरम्यान पीडित मुलीने आरोप केला की, तिच्यावर तिच्या वडिलांनी आणि प्रियकराने अनेकदा बलात्कार केला होता. त्यानंतर ती गर्भवती राहिली. पीडित मुलगी तिचे कुटुंब पूर्वी नवी मुंबईतील पनवेल येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले. (हेही वाचा: मुंबई: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन महिलांना अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 27 वर्षीय व्यक्तीला अटक)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमध्येच शेजारी राहणाऱ्या 21 वर्षीय आरोपीशी पीडितेची ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, तिच्या कुटुंबातील सदस्यांचा या नात्याचा विरोध असल्याने ते वसिंद येथे गेले. मात्र त्यानंतरही पीडित मुलगी हिला व तिचा प्रियकर यांचे भेटणे सुरूच होते. आता पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे तिचे वडील व प्रियकर यांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणाची पुढील चौकशीचा भाग म्हणून आरोपींची डीएनए चाचणी घेण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याआधी मुंबईत पोटच्या दहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी बापाला अटक केली आहे.