IPL Auction 2025 Live

Shivshahi Bus Fire at Satara: सातारा येथे शिवशाही बसला आग, पोलिसांकडून एकाला अटक

पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. संबंधित व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. परंतू, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Shivshahi Bus | (Photo Credits: MSRTC)

सातारा बस स्थानक (Satara St Stand) परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) शिवशाही बसला आग (Shivshahi Bus Fire at Satara) लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. शिवशाही बसला (Shivshahi Bus) आग लागली नसून ती लावल्याचा संशय व्यक्त होतो आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. संबंधित व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. परंतू, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

या आधीही शिवशाही बसबाबत अनेकदा अपघात घडले आहेत. पुण्यातही मागे एकदा शिवशाही बसने पेट घेतला होता. त्यामुळे वातानुकीलत सेवा देणारी आणि सर्वसामान्यांच्या उत्सुकतेसोबतच आरामदायी प्रवासासाठी प्रसिद्ध असली तरी या बसचे अपघाताचे प्रमाणही मोठे असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आले आहे. (हेही वाचा, व्हिडिओ: शिवशाही बस जागेवरच पेटली, आलीशान गाडी जळून खाक)

खासगी बस वाहतूकीस टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही बस सेवा सुरु केली आहे. ही बस सेवा गेल्या काही वर्षांपासून महामंडळाच्या सेवेत आहे. ही बस पूर्ण पणे वातानुकुलीत असते. सर्वसामान्य ग्राहकांनाही वातानुकुलीत बसने प्रवास परवडावा यासाठी राज्य सरकारने ही सेवा सुरु केली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, शहरांसह राज्यातील काही महत्त्वपूर्ण शहरांमध्ये ही बस विना वाहक विना थांबा प्रवास करते. दीर्घ पल्ल्याच्या बसमध्ये वाहक असतो.

दरम्यान, शिवशाही ही बस सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवली जाते. मात्र, बसमधील चालक आणि वाहक हे कंत्राटी तत्त्वावर काम करणारे असतात. राज्य महामंडळाकडून या बससाठी प्रतिकिलोमीटर या दराने विशिष्ठ रक्कम दिली जाते. याशिवाय बससाठी इंधन पुरवठा, चालक आणि टोल आदी गोष्टींचा खर्च मरापम करत असते. या बसमची आसनक्षमता 45 इतकी आहे. बसमधील चालकही वाहकाचे काम करत असतो.