Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result: जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा, जयश्री महाजन महापौरपदी होणार विराजमान
शिवसेनेने सांगलीनंतर पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करत भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.
जळगावच्या महापालिका निवडणूक (Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result) आज ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. या लढत खूपच अटीतटीची होती. मात्र या लढतीत शिवसेनेने भाजपला दे धक्का करत विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांची महापौरपदी वर्णी लागली असून त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे (Pratibha Kapse) यांचा 15 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेने सांगलीनंतर पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करत भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल 15 मतांनी पराभव करत बाजी मारली. जयश्री महाजन यांना 45 मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना 35 मते मिळाली. भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्यानं शिवसेनेचा विजय सुकर झाला.हेदेखील वाचा- Jalgaon Municipal Corporation Mayor Election: जळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक, कोण मारणार बाजी? ऑनलाईन पद्धतीने होणरा मतदान; भाजपची प्रतिष्ठा पणाला
जळगाव महापालिका महापौरपदाची मतमोजणी पूर्ण झाली असली तरी उपमहापौर पदाची मतमोजणी प्रक्रिया अजून सुरु आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज अवैध असल्याचा दावा भाजपनं केला आहे. त्यामुळे भाजप सदस्य आक्रमक झाले असून सभागृहात गदारोळ सुरु आहे.
राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जळगाव महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास भाजपने न्यायालयात आव्हान दिले. परंतू कोरोना संकट गंभीर असल्याचे सांगत न्यायालयाने ही निवडणूक ऑनलाईनच घ्यावी असे सांगितले आणि मग भाजपचा नाईलाज झाला. आता न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक ऑनलाईन पद्धतीने पार पडते आहे. त्यामुळे नगरसेवग विविध ठिकाणांहून (ज्या ठिकाणी असतील तेथून ) मतदान करणार आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली.