Shivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा होणारच, शिवभक्तांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करणार- छत्रपती संभाजी राजे
मात्र यंदा या सोहळ्यासाठी शिवभक्तांनी रायगडावर गर्दी करू नये त्यांच्यासाठी खास थेट लाईव्ह प्रक्षेपण (Shivrajyabhishek Sohala Live) करता येईल अशी सोय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असेही संभाजी राजे यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala 2020) दिन यंदा कोरोनामुळे (Coronavirus) रद्द होणार का याविषयी सर्व शिवभक्तांमध्ये असणाऱ्या प्रश्नाला आता छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट मार्फत उत्तर दिले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही 6 जून रोजी रायगडावर (Raigad) शिवराज्याभिषेक सोहळा परंपरेनुसार पार पडणारच असा विश्वास संभाजी राजे यांनी व्यक्त केला आहे. मात्र यंदा या सोहळ्यासाठी शिवभक्तांनी रायगडावर गर्दी करू नये त्यांच्यासाठी खास थेट लाईव्ह प्रक्षेपण (Shivrajyabhishek Sohala Live) करता येईल अशी सोय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असेही संभाजी राजे यांनी सांगितले आहे.
यंदा कोरोनाचे संकट असल्याने राज्यातील सर्व धार्मिक. सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी शिवराज्याभिषेक सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे असे छ्त्रपटु संभाजी राजे यांनी सांगितले आहे. ही परंपरा आहे आणि त्यात खंड पडणार नाही असेही ते म्हणाले. यासाठी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समिती चे सदस्य, दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा सुरु आहेत. कार्यक्रमाच्या रुपरेषेविषयी अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
छत्रपती संभाजी राजे ट्विट
दरम्यान, दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदा तिथीनुसार हा सोहळा 4 जून रोजी साजरा होणार आहे तर तारखेनुसार रायगडावर 6 जून रोजीच सोहळा पार पडेल.