रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ; पहा व्हिडिओ

अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही 3 शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जाईल.

Shivrajabhishek Sohala | Representational Image | (Photo Credits: File Photo)

अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही 346 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जाईल. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी रायगडावर मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. बुधवारी संध्याकाळपासूनच रायगडावर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमांना खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासह पोलंड, चीन येथील प्रतिनिधीही उपस्थित होते.

सर्वप्रथम खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. रायगडाचा संपूर्ण परिसर शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी निनादला. त्याचबरोबर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम पार पडला. यात शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमध्ये तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले.

पहा व्हिडिओ:

आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. तसंच रायगडावर शिवभक्तांनी स्वच्छता मोहिमही राबवली आहे.