Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; जुन्नर वनविभागाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा
परिणामी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळल्याची घटना घडली आहे.
Shivneri Fort: राज्यात सर्वदूर पाऊस सक्रीय झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. पुण्यात किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळल्याची घटना(Shivneri Fort Kada Collapsed)घडली आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा पाऊस झाला. परिणामी अनेक ठिकाणी पाणी साठले होते. अनेक घरात पाणी शिरले होते. काल शहरात तीन मजली इमारत कोसळली होती. त्यात ढिकाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. आता शिवनेरी किल्लाच्या तटबंदीचा बुरुजही कोसळला आहे. त्यामुळे शिवनेरीवर जाताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जुन्नर वनविभागाने (Junnar Forest Department)आवाहन केलं आहे. (हेही वाचा:Sawantwadi Crime: सावंतवाडीत विदेशी महिलेला घनदाट जंगलात ठेवलं बांधून; 3 दिवसांनी पोलिसांकडून सुटका )
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ल्याच्या गणेश दरवाजावरील बाजुचा कडा खाली कोसळल्याने भातखळा तटबंदीचा काही भाग कोसळला. पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर ३१ जुलैपर्यंत बंदी लागू आहे. तरीही पर्यटक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कानाडोळा करत किल्ले शिवनेरीवर दाखल होत आहेत. आता या घटनेनंतर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कतेची पावले उचलण्यात येत आहेत. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, याच काळात पन्हाळगडावरही पडझडीची घटना घडली. पूर्व तटबंदीतील दगडी शिळा कोसळली आहे. पन्हाळगडावरील नायकीनीचा सज्जा या ऐतिहासिक इमारतीच्या जवळील तटबंदीतील दगडी शिळाच्या समूहातील एक शिळा कोसळली. तब्बल दहा ते बारा फूट उंचीची ही शिळा होती. या तटबंदीच्या खाली बुधवार पेठ, मंगळवार पेठ, आणि नेबापूर अशी गाव आहेत. रात्री तटबंदीतून मोठा आवाज आला. त्या आवाजाने मंगळावरपेठेतील लोक घरा बाहेर आले. पण रात्रीच्या अंधारात पडलेल्या काळोखामुळे काही दिसत नव्हते. स्थानिक नागरिकांनी रात्री बॅटरीच्या प्रकाशझोतात तटबंदीत पाहिले. त्यानंतर तटबंदीतून दगडी शिळा कोसळल्याचे दिसले.