Uddhav Thackeray On Dynastic Politics: घरंदाज माणसानेच घराणेशाही विषयावर बोलावे; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला

त्यांच्या आजूबाजूची घराणेशाही त्यांना प्राणप्रीय असते, असाही हल्ला ठाकरे यांनी चढवला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये घराणेशाहीवरुन टीका केली. मात्र, ही टीका करताना घरंदाज माणसांनीच घराणेशाही (Dynastic Politics) विषयावर बोलावे असा टोला लगावत त्यांना त्यांच्या आजूबाजूला असलेला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार दिसत नाही. त्यांच्या आजूबाजूची घराणेशाही त्यांना प्राणप्रीय असते, असाही हल्ला ठाकरे यांनी चढवला आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे आज ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गोदातीरी आरतीचे निमंत्रण

राम मंदिर मुद्द्यावरुन बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणारी प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा म्हणजे राष्ट्र निर्माणाचीच प्राणप्रतिष्ठा आहे, अशी आमची भावना आहे. त्यामुळे येत्या 22 जानेवारीला आम्ही नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत, असे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हटले आहे. तसेच, त्याच दिवशी गोदातीर येथे आरतीही करणार आहोत. या आरतीचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आम्ही देत आहोत. आमचे खासदारही अधिकृतपणे भेटून राष्ट्रपतींना गोदातीर येथील आरतीचे राष्ट्रपतींना निमंत्रण देतील असे सांगतानाच काळाराम मंदिरातील राम मंदिर मूर्तीचे प्रतिष्ठापणा राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावी, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Saamana Attacks On Bjp: 'नार्वेकरांनी भाजपच्या टेस्ट ट्यूब बेबीचं रूपांतर खऱ्या शिवसेनेत केलं'; UBT मुखपत्र 'सामना'तून भाजपवर टीकास्त्र)

'राम हा आमच्या आस्तेचा विषय'

अयोध्या आणि राम मंदिर ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. त्यामुळे ज्या ज्या वेळी माझ्या मनात आले आहे तेव्हा तेव्हा मी अयोध्येला गेलो आहे. मुख्यमंत्री असताना आणि नसतानाही गेलो होतो. मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा रायगड येथील माती घेऊन गेलो होतो. राम हा आमच्या आस्तेचा विषय आहे. आज तिथे झेंडे लावण्यासाठी अनेक लोक जात आहेत. मात्र, बाबरीचा घुमट जेव्हा पडला तेव्हा जबाबादारी स्वीकारायला कोणीच तयार नव्हते. ती जबाबदारी शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांनी स्वीकारली, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Ram Temple Premises Looks During Night: रात्रीच्या वेळी 'असा' दिसतो राम मंदिर परिसर; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले खास फोटोज, See)

एक्स पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुनही त्यांनी सडकून टीका केली. काल त्यांनी मुंबईतील अटल सेतू कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मात्र, आम्हाला कुठेही अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो दिसला नाही. आमची विनंती आहे की, अयोध्येमध्ये राम मंदिरात रामांची प्रतिष्ठापणा करताना किमान तिथे तरी प्रभू रामचंद्रांचीच मूर्ती ठेवा, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.