महाराष्ट्र: राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या कोरोना व्हायरसंबंधितच्या बैठकीवर शिवसेनेकडून आक्षेप

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी कोरोना व्हायरस संबंधिक एका बैठकीचे आयोजन केले होते. पण या बैठकीवर आता शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. त्याचसोबत समांतर शासन या संदर्भात भ्रम निर्माण करु शकते असे ही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र: राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या कोरोना व्हायरसंबंधितच्या बैठकीवर शिवसेनेकडून आक्षेप
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढत असल्याने सरकारकडून ठोस पावले उचचली जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला लॉकडाउनचे आदेश वाढवण्यासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अन्यथा बाकी कोणतीही कामे किंवा कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी कोरोना व्हायरस संबंधिक एका बैठकीचे आयोजन केले होते. पण या बैठकीवर आता शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. त्याचसोबत समांतर शासन या संदर्भात भ्रम निर्माण करु शकते असे ही त्यांनी म्हटले आहे.

खरंतर भगत सिंग कोश्यारी यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी कोणती पावले उचलण्यात यावी या संबंधित एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला प्रशासनातिल अधिकाऱ्यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. मात्र या बैठकीवरुन शिवसेनने आक्षेप घेतला आहे.(सांगली मध्ये 26 पैकी 22 जण कोरोनामुक्त; पालकमंत्री जयंत पाटील यांनी विलगीकरणाचा प्रयोग यशस्वीरित्या निभावलेल्या स्थानिकांचे मानले आभार) 

दरम्यान, संपूर्ण देशभरात लॉकडाउनचे आदेश लागू करण्यात आले आहेत. याच परिस्थितीत डीएचएफएलचे प्रमुखे कपिल आणि धीरज वाधवानसह 23 जणांनी महाबळेश्वरचा प्रवास केल्याचा प्रकार समोर आला आहे.

उद्धव ठाकरे यांचा मार्ग झाला मोकळा ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला ' हा' महत्वाचा निर्णय : Watch Video

त्यामुळे आता या गोष्टीवरुन राजकरण सुरु झाले आहे. भाजपने या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रवासासाठी परवानगी देणाऱ्या सचिव अमिताभ गुप्ता यांना आवश्यक सुट्टीवर पाठवले आहे. या प्रकरणी विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात श्रीमंत आणि धनवानांसाठी लॉकडाउनचे आदेश लागू नाही आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2020 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).