Shiv Sena: बाळासाहेबांची खरी शिवसेना कुठल्या गटाची माहिती नाही पण हो शिवसेना माझी लेक: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक

या सोहळ्यात त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या नवजात लेकीचं नाव शिवसेना ठेवलं आहे.

Shiv Sena | (File Photo)

गेले काही महिन्यात कुणाची शिवसेना (Shiv Sena) ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आणि कुणाची शिवसेना ही खोटी असा राज्यात वाद रंगला आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणतात माझी शिवसेना तर शिंदे गट (Shinde Group) म्हणतो आम्ही खरे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार तर ही शिवसेना आमची. राज्यभरात शिवसेना नेमकी कुठल्या गटाची असा वाद रंगला सताना बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणतो शिवसेना माझी लेक. ऐकायला जरा वेगळं वाटतं पण हो हे खरं आहे. पांडूरंग वाढकर (Pandhurang Wadhakar) ह्या शिवसैनिकाची शिवसेना ही लेक आहे. म्हणजे पांडूरंग वाढकर या बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला आताचं नवजात लेक झाली त्याने बाळासाहेबांच्या स्मरणार्थ आपल्या लेकीचं नाव शिवसेना ठेवलं आहे.

 

महाड (Mahad) तालुक्यातील किये गोठवली गावातील माजी उपसरपंच पांडुरंग वाडकर यांनी 17 नोव्हेंबर बाळासाहेबांच्या स्मृतिदिना दिवशीच आपल्या कन्येच्या नामकरण विधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या नवजात लेकीचं नाव शिवसेना (Shiv Sena) ठेवलं आहे. यातून पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाचं दर्शन झालं. शिवसेना ता संपली, आता शिवसेनेत काहीही उरलं नाही पण जेव्हा पर्यत बाळासाहेबांचे पाडुरंग वाडकरांसारखे कट्टर शिवसैनिक आहेत तेव्हा पर्यत शिवसेना संपण शक्य नाही. (हे ही वाचा:-Aditya Thackeray On Shinde Government: खोट्या आश्वासनांवर शिंदे सरकार चालत आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल)

 

पांडूरंग वाडकर (Pandhurang Wadkar) यांनी आपल्या कन्येचे नावच 'शिवसेना' (Shiv Sena) असे ठेवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पांडुरंग वाडकर यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा मी कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मुलीचे नाव शिवसेना असे ठेवले आहे. या नामकरण सोहळ्याला आजूबाजूच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती. यापुढे लवकरच पांडुरंग वाडकर आपल्या कन्येला घेऊन मातोश्री येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.