Shiv Sena On Bhagat Singh Koshyari: शिवरायांचा अपमान करणार्‍यांनी महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, शिवसेनेचं मुखपत्र सामनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपतींचा अपमान करत पुन्हा एकदा माती खाल्ली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

Governor Bhagat Singh Koshyari (Photo Credit - Twitter)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच्या (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यात गदारोळ माजला आहे. विरोधकांकडून  राज्यपाल कोश्यारींसह भाजप आणि शिंदे गटावर मोठी टीका होत आहे. तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा चांगलाचं सामाचार घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक असं वक्तव्य करत पुन्हा एकदा भगतसिंह कोश्यारी यांनी एक नवा वाद ओढावून घेतला आहे. तरी राज्यपालांनी छत्रपतीं बाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याची माफी मागावी असा घणाघात शिवसेने कडून करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येवून भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपसह शिंदे गटाने मोठा निषेध करत रस्त्यावर उतरले होते तर आता छत्रपती विरोधातील राज्यपालांच्या या वक्तव्यावर भाजपसह शिंदे गट काय भुमिका घेणार असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपतींचा अपमान करत पुन्हा एकदा माती खाल्ली असल्याचे शिवसेनेने (Shiv Sena) म्हटले. शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे, या शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या वर टीका करण्यात आली आहे. (हे ही वाचा:- Sanjay Raut: मी तुरुंगात असताना भाजपाला असुरी आनंद, हे तर मुघल शासन; शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात)

 

तसेच शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी (Sudhanshu Trivedi) उकरून काढला. शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला अशी टिका सामनाच्या अग्रलेखातून भाजप, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif