Sanjay Raut On Marshall Law: 'लोकशाहीच्या मंदिरात मार्शल कायदा', शिवसेना खासदार संजय राऊत यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
मार्शलला पाचारण करण्यात आल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Shiv Sena) यांनी तर आपल्या ट्विटर हँडलवरुन या प्रकाराचे फोटो ट्विट केले आहेत. तसेच, ही आपली संसदीय लोकशाही आहे का? असा सवाल उपस्थित करत लोकशाहीच्या मंदिरात मार्शल कायदा, अशी टीका केली आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन यंदा राज्यसभा (Rajya Sabha) आणि लोकसभा (Rajya Sabha) या दोन्ही सभागृहात चर्चेला न आलेल्या मुद्द्यांमुळे गाजले. पेगसास आणि कृषी विधेयकं हे ते दोन मुद्दे. संसदेची दोन्ही सभागृहे विरोधकांच्या आक्रमकतेमुळे कायमच तापलेली राहिली. परिणामी केंद्र सरकारला आपले कामकाज रेटून न्यावे लागले तरेच केवळ बहुमताच्या जोरावर विधेयके संमत करावी लागली. दरम्यान, काल (11 ऑगस्ट) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत विमा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. धक्कादायक असे की, या विधेयकाच्या मंजूरीवेळी सभागृहात चक्क मार्शल उभे करण्यात आले. मार्शलला पाचारण करण्यात आल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Shiv Sena) यांनी तर आपल्या ट्विटर हँडलवरुन या प्रकाराचे फोटो ट्विट केले आहेत. तसेच, ही आपली संसदीय लोकशाही आहे का? असा सवाल उपस्थित करत लोकशाहीच्या मंदिरात मार्शल कायदा, अशी टीका केली आहे.
संपूर्ण अधिवेशनभर विरोधक पेगासस (Pegasus) मुद्द्यावरुन आक्रमक राहिले. तरीही सरकार जुमानले नाही. सरकारने बहुमताच्या जोरावर विधेयके मंजूर केली. 127 वी घटना दुरुस्ती एकमेव विधेयक राहिले. ज्यावर सांगोपांग चर्चा होऊ शकली. राज्यसभेत सामान्य विमा कंपन्यांचे खासगीकरण करण्यासाठी शेवटच्या दिवशी विधेयक आले. हे विधेयक मंजूर करताना सभागृहात मार्शलला पाचारम करण्यात आले. याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. (हेही वाचा, Parliament Monsoon Session 2021: लोकसभा मुदतीपूर्वीच अनिश्चित काळासाठी स्थगित, विरोधकांकडून जारदोर टीकास्त्र)
संजय राऊत ट्विट
संजय राऊत यांनी केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारला आहे, एखादे विधेयक मंजूर करताना मार्शलला पाचारण करावे लागते. आपणांस आम्हाला (विरोधकांना) घाबरावायचे आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. दरमयान, आज आम्ही राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जून खडगे यांच्या कक्षात बैठक घेत आहोत. या वेळी काय करायचे ते आम्ही ठरवू, असे राऊत यांनी म्हटले आहे.
एएनआय ट्विट
दरम्यान, विविध मुद्द्यांवर विरोधी पक्ष एकत्र आहे. येत्या 20 ऑगस्टला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी बोलणार आहेत. या चर्चेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील बैठकीत सहभागी होतील, असे संजय राऊत म्हणाले.