Shivsena MLA Santosh Bangar: नारायण राणे यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. यावरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि प्रतिक्रियाच्या फैरी कायम असताना आमदार संतोष बांगर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Shiv Sena MLA Santosh Bangar | Photo Credits: Facebook)

शिवसेना आमदार संतोष बांगर (Shiv Sena MLA Santosh Bangar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. यावरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि प्रतिक्रियाच्या फैरी कायम असताना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) वादग्रस्त वक्तव्य (Shiv Sena MLA Santosh Bangar Controversial Statement ) केले आहे. त्यामुळे या वादाला आता काय वळण लागते आणि भाजप (BJP) काय भूमिका घेतो हे महत्त्वाचे आहे.

आमदार संतोष बांगर हे शिवसेना पक्षाचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. राणे यांच्याबाबत बोलताना त्यांची जीभ घसरली. भारतीय जनता पक्ष आमदार बांगर यांच्या विधानाबाबत आक्रमक भूमिका घेणार असल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Anil Parab Viral Video: अनिल परब यांचा 'तो' व्हिडिओ झाला व्हायरल, नारायण राणे यांच्या अटकेशी जोडला जातोय संबंध)

आमदार संतोष बांगर काय म्हणाले?

''अरे तू काय सांगतो कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलीस संरक्षण थोडसं बाजूला कर. हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केलं, तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर म्हणू नको.”

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या विधानावरुन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हिंगोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली आहे.

व्हिडिओ

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

रायगड येथील महाड येथे नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली. या यात्रेदरम्यानस सोमवारी (8 ऑगस्ट) बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली. नारायण राणे म्हणाले की, ''त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती''.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif