शिवसेना आमदार संजय रायमूलकर, काँग्रेसचे राहुल बोन्द्रे यांना चोरट्यांनी लूटलं, कल्याण ते ठाणे रेल्वे स्टेशन दरम्यान घडला प्रकार
अधिवेशनादरम्यान, कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा याबाबत विचारविनिमय करुन आवश्यकतेनुसार कायदे केले जातात. धक्कादायक असे की, सर्वसामान्यांची गोष्ट निराळीच. पण, इथे चक्क आमदारच सुरक्षित नसल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे. दरम्यान, आमदारांनी सीएसएमटीच्या लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसच आमदार राहुल बोन्द्रे ( Congress MLA Rahul Bondre) तसेच, शिवसेना आमदार संजय रायमूलकर (Shiv Sena MLA Sanjay Raimulkar) यांना रेल्वे प्रवासात चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार पुढे आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. हा प्रकार कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Junction Railway Station) ते ठाणे रेल्वे स्टेशन (Thane Railway Station) दरम्यान घडल्याची माहिती आहे. राज्य विधिमंळाचे पावसाळी अधिवशेन राजधानी मुंबईत सुरु आहे. अधिवेशनादरम्यान, कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा याबाबत विचारविनिमय करुन आवश्यकतेनुसार कायदे केले जातात. धक्कादायक असे की, सर्वसामान्यांची गोष्ट निराळीच. पण, इथे चक्क आमदारच सुरक्षित नसल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे. दरम्यान, आमदारांनी सीएसएमटीच्या लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस आमदार राहुल बोन्द्रे, शिवसाना आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडकर हे तिन्ही आमदार अधिवशेन सुरु असल्याने मुंबईला निघाले होते. आदारांसाठी असलेल्या विशेष बोगीत चोरीचा हा प्रकार घडला. मुंबईला जाण्यासाठी आमदार बोन्द्रे आणि त्यांच्या पत्नी वृषाली बोन्द्रे यांनी मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेस रविवारी घेतली. तर, शिवसेनेचे आमदार आमदार रायमूलकर आणि खेडेकर यांनी जालना येथून देवगिरी एक्स्प्रेसने घेतली.
सोमवारी सकाळी 6 ते 7 च्या सुमारास आमदार बोन्द्रे कल्यण स्टेशनला उतरण्याची तयारी करत होते. दरम्यान, एका चोरट्याने पत्नी वृषाली यांच्या हातातील पर्स आणि आमदार बोन्द्रे यांच्या हातातील फाईल हिसकावून पळवली. हा प्रकार आमदार बोन्द्रे यांच्या ध्यानात येताच त्यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चोरटा हाती लागला नाही. त्याने पळ काढण्यात यश मिळवले. दरम्यान, पत्नीच्या पर्समध्ये 26 हजारांची रोकड, एटीम कार्डसह इतरही साहित्य चोरीला गेल्याचे बोंद्रे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल 2019: इथे पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी पक्षाच्या नावासह)
दरम्यान, शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर हे मुंबईला सोमवारी सकाळी पोहचले. मात्र, त्यांच्यासोबतही असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला आलेले आमदार रायमूलकर हेसुद्धा कल्याण स्टेशनला उतरत होते. त्यावळी चोरट्याने त्यांचा मोबाईल आणि खिशातील 10 हजारांची रोकड लंपास केली. ही घटनाही सोमवारी सकाळच्या सुमारासच घडली.
हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही तर, आमदार रायमुलकर यांच्यासोबत असलेल्या आमदार खेडेकर यांच्या बॅगेलाही चोरट्यांनी ब्लेड मारले. कल्याण रेल्वे स्टेशन ते ठाणे रेल्वे स्टेशन दरम्यान हा प्रकार घडला. रेल्वे प्रवासात जर आमदारांबाबत अशी घटना घडत असेल तर सर्वसामान्यांबाबत काय होत असेल, अशी चर्चा या प्रकारानंतर सुरु झाली आहे.