Shiv Sena Dussehra Rally: उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मैदानावरील शिवसेना मेळाव्यात 'या' दोन नेत्यांचे भाषण ठरले हिट; घ्या जाणून

ही कसर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भरुन काढली.

Bhaskar Jadhav, Sushma Andhare | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दसरा सणानिमित्त राज्यभर उत्साह असताना राजधानी शहर मुंबई मात्र राजकीय मेळाव्यांनी दणाणून गेले. दिवसभरच शहरात राजकीय वातावरण भारुन राहिले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मेळावा (Shiv Sena Dussehra Rally) शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर भरला. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मेळावा बीकेसी मैदानावर भरला. दरम्यान, शिवसेनेचा आवाज अशी ओळख असलेले दिग्गज नेते आणि आमदार एकापाठोपा एक अशे शिंदे गटात गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातून शिवसेनेची आक्रमकता कोण मांडणार याबाबत नक्कीच उत्सुकता होती. ही कसर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भरुन काढली.

सुषमा अंधारे

एका बाजूला शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत तुरुंगात दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला आमदार यामुळे शिवसेनेकडे मोठी पोकळी होती. ही पोकळी भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांनी भरुन काढली. सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. खास करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरण पावस्कर, प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांवर सुषमा अंधारे यांनी कडाडून हल्ला चढवला. बंडखोरांचा उल्लेख 'गद्दार' असा करत या नेत्यांनी केलेल्या पक्षांतराचा जोरदार समाचार घेतला. ठाकरे कुटुंबाने हिंदुत्व कधीच सोडले नाही. पण, आज जे गद्दार शिवसेनेतून गेले आहेत ते केवळ ईडी, सीडी आणि सीबाआयच्या धाकाने गेले आहेत. या धाकानेच त्यांना हिंदुत्त्व आठवले आहे, अशी जहरी टीका अंधारे यांनी केली. शिंदे गटाला हिंदुत्त्वाशी सोयरसुतक राहिले नाही. त्यांना भक्त भाजपला मदत करायची आहे, असेही अंधारे यांनी म्हटले. नारायण राणे यांच्यावर कडाडून टीका करताना अंधारे अधिक आक्रमक झाल्याच त्यांनी राणे यांच्या मुलांचा उल्लेख त्यांनी ‘ वाह्यात बाजारबुणगे’ असा केला. (हेही वाचा, Shiv Sena Dussehra Rally: बापाची चोरी करणाऱ्यांवर मी काय बोलू? शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीसांसह अमित शहांवर डागली तोफ)

भास्कर जाधव

भास्कर जाधव हे कालच्या शिवसेना मेळाव्यात विशेष आक्रमक पाहाटला मिळाले. त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार 'प्रहार' केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच नारायण राणे यांना मोठे केले. असे असले तरीही अजून हे शिपाईच राहिले आहेत. ज्या धनुष्यबाणावर हे निवडून आले तोच धनुष्यबाण गोठविण्यासाठी शिंदे गाटकडून यांचा प्रयत्न आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अनेक मतभेद होते. आहेत. शिवसेनेने काँग्रेसवर नेहमीच जहाल टीका केली. परंतू, असे असले तरी त्यांनी कधीही शिवतिर्थावर दसरा मेळाव्यास शिवसेनेला परवानगी नाकारण्याचे पाप केले नाही. हे पाप शिंदे गटाने केले. एक सच्चा शिवसैनिक हे कधीही विसरणार नाही, असे भास्कर जाधव मिळाले.

सुभाष देसाई

माजी मंत्री आणि शिवसेना ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचेही शिवतिर्थावर भाषण झाले. सुभाष देसाई यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव घेत हल्लाबोल केला. महाविकासआघाडी सरकारने सत्तेत असताना केलेल्या कामांचाही देसाई यांनी या वेळी दाखला दिला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे भाषण दसरा मेळाव्याचे प्रमुख आकर्षण होते. उद्धव ठाकरे या कसोटीला खरे उतरले देखील. परंतू, त्यांच्या भाषणानंतर भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्या भाषणाना जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर या दोघांचे भाषण हिट होते, असे उपस्थितांनी सांगितले.