Shiv Sena Dussehra Rally 2020: मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला करत उद्धव ठाकरे राजकारणावर काय बोलणार? भाषणाबाबत उत्सुकता; शिवसेना दसरा मेळावा इथे पाहा LIVE

मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा गेली अनेक वर्षे साजरा होत आला आहे. मात्र, यंदा ही परंपरा कोरोना व्हायस संकटामुळे खंडीत झाली आहे. यंदा हा मेळावा दादर येथील सावरकर स्मारकात केवळ 50 जणांच्या उपस्थित साजरा होणार आहे. मात्र हा संपूर्ण सोहळा सर्वांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आज पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना दसरा मेळाव्यात (Shiv Sena Dussehra Melava 2020) शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजता हे भाषण शिवसना सोशल मीडिया अधिकृत अकाऊंट्सवर पाहता येणार आहे. उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना ((Shiv Sena ) मोठ्या प्रमाणावर मवाळ धोरण स्वीकारताना पाहायला मिळाली आहे. दरम्यान गेल्या काही काळात महाराष्ट्र, मुंबई पोलीस, शिवसेना, महाविकासआघाडी सरकार, आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन जोरदार आरोप करण्यात आले. याशिसोबतच अर्णब गोस्वामी, अभिनेत्रि कंगना रनौट, भाजप यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका केली. आक्षेपार्ह वक्तव्यं केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना दसरा मेळावा व्यासपीठावरुन काय बोलणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

शिवसेना दसरा मेळाव्यास मोठी परंपरा आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा गेली अनेक वर्षे साजरा होत आला आहे. मात्र, यंदा ही परंपरा कोरोना व्हायस संकटामुळे खंडीत झाली आहे. यंदा हा मेळावा दादर येथील सावरकर स्मारकात केवळ 50 जणांच्या उपस्थित साजरा होणार आहे. मात्र हा संपूर्ण सोहळा सर्वांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

शिवसेना दसरा मेळावा: उद्धव ठाकरे यांचे भाषण इथे पाहा लाईव्ह

युट्युब- https://www.youtube.com/c/ShivSenaOfficial/about

ट्विटर- https://twitter.com/ShivSena/status/1320003086212059136

फेसबुक - https://www.facebook.com/Shivsena

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आधी अनेक राजकीय मुद्द्यांवर प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले आहे की, मी राजकीय बोलणार नाही. राजकीय बोलायचे ते योग्य वेळी बोलेण. त्या वेळी मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेऊन बोलेन, असे ठाकरे यांनी सांगितले होत. (हेही वाचा, Shiv Sena Dussehra Rally 2020: शिवतीर्थ यंदा सुने सुने! शिवसेना दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार, कोरोना व्हायरस संकटामुळे परंपरा खंडीत)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली. या वेळी त्यांनी आपल्याला जे काही राजकीय बोलायचे ते आपण दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे आगोदरच सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आजच्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



संबंधित बातम्या