Aaditya Thackeray Visit to Ayodhya: आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा, शिसेनेत जल्लोष; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याबातब अधिक उत्सुकता आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री, शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर (Aaditya Thackeray Visit to Ayodhya) आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याबातब अधिक उत्सुकता आहे. शिवसेनेकडून या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे आज सकाळी मुंबईहून निघाले आहेत. सकाळी 10.30 च्या सुमारास ते लखनऊ विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर त्यांच्या दौऱ्या सुरुवात होईल.

अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रवाना झाले आहेत. खास करुन नाशिक येथून एका ट्रेनने हे शिसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. जवळपास 35 तासांचा प्रवास करुन हे शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्या स्थानकात पोहोचताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिसेनेनेचे वरिष्ठ नेतेही या दौऱ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसना नेत्यांकडून या तयारीच्या अनुषंघाने वारंवार आढावा घेतला जात आहे. या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. (हेही वाचा, Aaditya Thackeray to Visit Ayodhya: आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेना नेते अयोध्येत दाखल, संजय राऊत, एकनाथ शिंदे यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद)

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे वेळापत्रक

सकाळी 11 वाजता-

आदित्य ठाकरेंचं लखनऊ विमानतळावर आगमन

दुपारी 1.30 वाजता-

अयोध्येत आगमन. इस्कॉन मंदिराला भेट

दुपारी 2.30 ते 3.30-

वाजण्याच्या दरम्यान हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद

दुपारी 4.30 वाजता-

हनुमान गढी येथे दर्शन घेणार

संध्याकाळी 5 वाजता-

प्रभू श्री रामाचं दर्शन

संध्याकाळी 6 वाजता-

लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार

संध्याकाळी 6.45 वाजता-

शरयू नदीच्या घाटावर आरती

संध्याकाळी 7.30 वाजता-

लखनऊला प्रस्थान

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा म्हणजे शक्तिप्रदर्शन आहे असेही म्हटले जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. हे शक्तिप्रदर्शन अजिबात नाही. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. या श्रद्धेपोटीच हा दौरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील