Shiv Jayanti 2020 निमित्त कोल्हापूर येथे काढण्यात आलेल्या मिरवणूकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; पहा Video

या मिरवणूकीचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

Shiv Jayanti Kolhapur (Photo Credit: Twitter)

Shiv Jayanti 2020: रयतेचा राजा म्हणून मनामनात स्थान निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा आज (19 फेब्रुवारी) जन्मदिवस. महाराष्ट्र राज्यासाठी हा तर एक सणच. महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो. मिरवणूकांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साह राज्यात पाहायला मिळतो. शाहूंच्या संस्काराने ओतप्रेत भरलेल्या कोल्हापूरातही शिवजयंतीचा जंगी सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्यात आपल्याला शाहू महाराज यांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रतिबंबित  होताना दिसत आहेत. शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजी महाराजांचे जल्लोषात आगमन करत आहेत. या मिरवणूकीचा व्हिडिओ समोर आला आहे. (शिवजयंती चं औचित्य साधत पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहचवा शिवरायांचे हे सकारात्मक विचार!)

छत्रपती शिवाजी राजे यांच्यातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे धर्मनिरपेक्षता. महाराजांनी हा गुण जनतेपर्यंत पोहचवला आणि अजूनही तो कोल्हापूरातील माणसांमध्ये जिवंत आहे. शिवजयंती निमित्त हीच महाराजांना खरी मानवंदना ठरणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. (शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे आकर्षक मराठमोळे Whatsapp Stickers येतील कामी; सोप्प्या स्टेप्स वापरून करा डाउनलोड)

पहा व्हिडिओ:

शिवजयंतीच्या सोहळ्यात आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य निनादेल. राज्याबाहेर इतर ठिकाणीही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळेल. मात्र कोल्हापूर नगरीत आजही जपले जाणारे महाराजांचे संस्कार आणि विचार नक्कीच खास आहेत. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक सण साजरा करण्याची ही परंपरा खरंच वाखाण्याजोगी आहे.