शिर्डीत उद्या ही 'बंद' राहणार कायम; स्थानिकांनी दिली माहिती
साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेला वाद हा चिघळत चालला असून त्याचे रुपांतर आजपासून सुरु झालेल्या बंदात झाले. याच पार्श्वभूमीवर 19 जानेवारी पासून सुरु झालेला बंद उद्या म्हणजेच 20 जानेवारीला देखील सुरुच राहणार आहे, अशी माहिती शिर्डी येथील स्थानिकांनी दिली आहे.
साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेला वाद हा चिघळत चालला असून त्याचे रुपांतर आजपासून सुरु झालेल्या बंदात झाले. याच पार्श्वभूमीवर 19 जानेवारी पासून सुरु झालेला बंद उद्या म्हणजेच 20 जानेवारीला देखील सुरुच राहणार आहे, अशी माहिती शिर्डी येथील स्थानिकांनी दिली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, हा बंद उद्याही कायम राहणार आहे. शिर्डीत आज सुरु झालेल्या बंदात हॉटेल, वाहतूक आणि अन्य सुविधा बंद राहिल्या होत्या. असं असलं तरी संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष दिपक मुगलीकर (Deepak Mugulikar) यांनी दिली होती.
काही दिवसांपूर्वी पाथर्डी ग्रामस्थांनी साईबाबांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे दावे केले होते यात भर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद सभेत "ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामांचा आरखडा तयार करण्यात आला असून लवकरच भूमिपूजन देखेल होईल" अशी घोषणा केली होती. यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी अधिकच आक्रमक होऊन पाथरी मध्ये 100 नव्हे तर 200 कोटींची कामे केली तरी चालतील पण त्या ठिकाणाला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून संबोधू नका असा पवित्र स्वीकारला होता.
हेदेखील वाचा- शिर्डी बंद करुन वाद संपणार नाही- छगन भुजबळ
त्याचेच रुपांतर बंदात झाले असून हा बंद उद्याही कायम राहणार आहे. यावर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहे. यामध्ये दोन्ही बाजूंचे मत विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे.
शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘साईसतचरित्र’मध्ये साईबाबांच्या जन्मस्थळाचा व वास्तव्याच्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र तरीही अनेक ठिकाणी साईंच्या जन्माचे दावे केले जातात इतकेच नव्हेत तर साईबाबांना या पूर्वी सुद्धा अनेकांनी धर्मात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील म्हंटले आहे. याच बाबींच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2020 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

