Shinde vs Thackeray : हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा (Watch Video)
तर, दुसरीकडे हातकणंगले मतदार संघामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र समोर आले आहे.
Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Elction 2024) होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर विविध मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडवणारी घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातही राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मतदान केंद्रांबाहेर पाहायला मिळत आहे. हातकणंगले(Hatkanangle) लोकसभा मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे (Shinde vs Thackeray) गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा:Raigad Lok Sabha Election 2024: महाडमध्ये मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा मृत्यू; रस्त्यातच चक्कर येऊन कोसळले)
वाळवा तालुक्यालील साखराळे गावातील मतदान केंद्रावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीची घटना घडली आहे. या मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. हे सर्व कार्यकर्ते बूथ क्रमांक 62,63 वर जमले होते. त्याचवेळी या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाली. सुदैवाने पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने परिस्थीती हाताबाहेर गेली नाही.
राजकीय कार्यकर्त्यांच्या राड्याची घटना घडल्यानंतर सध्या मतदान केंद्रावर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांचा हस्तक्षेपानंतर मतदान सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळकत आहे.