Election 2024: शिंदे-फडणवीस लोकसभा आणि विधानसभा 2024 च्या निवडणुका एकत्र लढणार ? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली प्रतिक्रिया

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले की, भाजप 2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युतीसह लढवेल.

Chandrashekhar Bawankule | (Photo Credit- Facebook)

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत (Election 2024) महाराष्ट्र भाजप (BJP) प्रमुखांनी विधान केलं आहे. भाजप आणि शिंदे एकत्र लढणार का? महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षांनी याबाबत विधान केले आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले की, भाजप 2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युतीसह लढवेल. आम्ही लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 हून अधिक जागा जिंकण्यासाठी तयार आहोत, असा दावा त्यांनी केला. हेही वाचा Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढणार? सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानाविरोधात समविचारी पक्षांच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

दरम्यान भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.