Sharad Pawar : 'पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात फरक नाही'; भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना शरद पवारांची घणाघाती टीका

भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे.

Sharad Pawar | (Photo Credit: ANI)

Sharad Pawar on PM Modi : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शन, लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरिकत्व संहिता कायद्यांना प्राधान्य दिले आहे. आता या जाहीरनाम्यावरुन शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही फरक नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार यांनी अकलूजमध्ये प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना असे म्हटले आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी शरद पवार तेथे होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात काहीच फरक नाही अशी टीका केली.  (हेही वाचा : Vladimir Putin Suffers Heart Attack: व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका- रिपोर्ट)

"पंतप्रधान हे त्यांच्या पदाची अप्रतिष्ठा करत आहे. आपला काम सांगण्याऐवजी ते नेहरुंवर टीका करत आहेत. त्यांचा भाषण ऐकलं ते म्हणतात की 'विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून देऊ नका.' लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधी पक्ष असावा लागतो. यामुळे रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक वाटत नाही," असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, जाहीरनाम्यांबाबत बोलतानास शरद पवार यांनी म्हटले की, 'भाजपने जाहीरनाम्यात काय आश्वासन दिले यावर भाष्य करणे आता योग्य नाही. नुसते आश्वासने देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. पाठीमागील जाहीरनाम्यातील आश्वासन अपूर्ण आहेत. त्यावर सविस्तर बोलू. ईडी, सीबीआयचा गैरवापर करणे हे मोदींचे सूत्र आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत,' असेही शरद पवार म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif