Sharad Pawar Writes Letter To PM Narendra Modi: शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; सहकारी बँकांच्या संरक्षणाची केली मागणी

या पत्रात शरद पवार यांनी मोदींकडे सहकारी बँकांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. लॉकडाऊन काळात शरद पवार यांनी मोदींनी पाचव्यांदा पत्र लिहिलं आहे.

Sharad Pawar (Photo Credit: PTI)

Sharad Pawar Writes Letter To PM Narendra Modi: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शरद पवार यांनी मोदींकडे सहकारी बँकांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. लॉकडाऊन काळात शरद पवार यांनी मोदींनी पाचव्यांदा पत्र लिहिलं आहे.

या पत्रात शरद पवार यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारने मध्यमवर्गीयाचे हित जपण्यासाठी सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतल्याचे तुम्ही म्हणालात. लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी असलेल्या या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाचे मी स्वागत आणि कौतुक करतो, असंही पवार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस की सीबीआयकडे? सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय)

सहकारी बँकांना 100 वर्षाची परंपरा लाभली आहे. सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. परंतु, प्रथमदर्शनी आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून रिझर्व्ह बँकेचे सहकारी बँक क्षेत्राबाबतचे धोरण ‘अस्पृश्य’तेचे राहिले आहे, असंही पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी पुढे म्हटलं आहे की, सहकारी बँकामध्ये आर्थिक शिस्त आणण्याचीही गरज असल्याचे म्हटलं जातं. परंतु, सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत केल्यास आर्थिक अनियमितता आणि घोटाळे होण्याची शक्यता आहे. घोटाळे, रक्कम आणि टक्केवारी मांडत पवारांनी सहकारी बँकांना खासगी बँकेत रुपांतरीत करणे चुकीचं असल्याचंदेखील म्हटलं आहे.