मुंबई: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार

कोरोना वाढत्या धोक्यामुळे महाराष्ट्रातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. यातच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव यावर्षी शांततेत पार पडणार आहे.

Sharad Pawar | (Photo credit : Facebook)

कोरोना वाढत्या धोक्यामुळे महाराष्ट्रातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. यातच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव यावर्षी शांततेत पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रसिद्ध असलेले अनेक सार्वजनिक गणेश मंडाळाने यावर्षी गणेशोत्सव (Lalbagh Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव ऐवजी आरोग्योत्सव आयोजन करण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने सोमवारपासून प्लाझ्मादान शिबिराचे (Plasmadan Camp) आयोजन करण्यात आले आहे. तसेच या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाचा धोका टाळणयासाठी लालबागचा राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव आणि समाजिक उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. लागबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीची प्रतिष्ठपना केली तर, गर्दी होण्याची अधिक शक्यता आहे. ज्यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो, हे नाकारता येणार नाही. लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेबांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडाळाने केईएम रुग्णालयाच्या साथीने प्लाझ्मादान मोहीम हाती घेतली आहे. इच्छुकांना 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच या प्लाझादान शिबिराचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. हे देखील वाचा- मुंबईचा राजा: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा वर्गणी न घेण्याचा निर्णय

ट्वीट-

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात रविवारी संध्याकाळपर्यंत आणखी 9 हजार 509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 260 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 41 हजार 228 वर पोहचली आहे. यापैंकी 15 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement