Sharad Pawar : 'अधिकार असतानाही कधीच सुप्रियाला मंत्री करण्याचा विचार केला नाही', शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
त्यांना अधिकार असतानाही कधीच मंत्री पद मिळालं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News : शरद पवार (Sharad Pawar)यांनी मुलगी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मंत्री न बनवण्याबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. 'सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार असतानाही मी सुप्रियाचा त्याबद्दल कधी विचार केला नाही', असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. इंदिरा गांधी यांनी देशाची प्रतिष्ठा वाढवली. माझ्या पक्षात महत्त्वाचा अधिकार असलेली व्यक्ती मी आहे. माझ्या अधिकाराचा उपयोग कधीच मी मुलीसाठी केला नाही, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याशिवाय, सध्याच्या काळात संसदेच्या स्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. भाजप (BJP)संविधान बदलायला निघाले आहे, म्हणून मी या निवडणूकीत इतकं लक्ष घातले आहे. याआधी मी कधी एवढं लक्ष निवडणूकांमध्ये घातलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.(हेही वाचा:Supriya Sule-Sunetra Pawar Hugs Each Other: बारामती लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात एकमेकींना आव्हान देण्यापूर्वी मंदिरात समोरासमोर आलेल्या सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट (Watch Video) )
शरद पवार पुढे म्हणाले की, उमेदवाराचा विचार करताना मतदारांनी क्वालिटीचा विचार करावा. मतदारांच्या आयुष्यात चांगला बदल करू शकलो तर, पदाचा उपयोग होतो. आधी शिक्षण म्हटलं की, मुंबई किंवा पुण्याला जावं लागतं होतं, याशिवाय पर्याय नव्हता. आता शैक्षणिक हब म्हणून बारामती बारामती पुढे आले आहे. कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठान या संस्था आहेत. कृषी विकास प्रतिष्ठानचा देशातील पहिल्या तीनमध्ये नंबर लागतो. डोनेशन नावाचा प्रकार इथे नाही, इथे ही संस्कृती नाही. त्यामुळे कर्तृत्ववान फक्त मुले असतात, हे डोक्यातून काढा. मुलींना संधी मिळाली तर, त्या कर्तृत्व सिध्द करतील, अशी भावनीक हाक शरद पवार यांनी मतदारांना दिली. (हेही वाचा: Supriya Sule Plays Badminton: प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे दिसल्या बॅडमिंटन खेळताना (Watch Video))
पुढे बोलताना शरद पवार यांनी सध्या निवडणूक जिंकण्यासाठी पैसा, सत्ता, यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, मी जेव्हा निवडणुकीला उभा राहिलो, तेव्हा निवडणुकीला खर्च येत नव्हता. सामाजिक बांधिलकी लोकं बघायचे. सध्याच्या आणि आधीच्या निवडणुकीत जमीन अस्मानाचा फरक होता. तेव्हा पैशाचा, सत्तेचा, यंत्रणेचा वापर होत नव्हता. लोकं वाटेल त्याला निवडून द्यायचे. शरद पवार यावेळी म्हणाले की, काम करीत असताना कधी मी पक्षाचा विचार केला नाही, विचारांशी पक्क राहण्याची भूमिका बारामतीच्या लोकांची आहे. त्यामुळे मी 50 वर्ष निवडून येतोय. माझ्या पहिल्या निवडणूक होती, तेव्हा एक डॉक्टर माझा प्रचार करायचे, तो पेशंट आला की, इंजेक्शन देताना विचारायचे मत कुणाला देणार, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.