Sharad Pawar On Bihar Politics: Nitish Kumar यांनी उचलेले पाऊल हे शहाणपणाचे; शरद पवारांची BJP वर टीका, नितिश कुमारांचे कौतुक
बिहार मध्ये नितिश कुमार यांनी भाजपा सोबत तोडलेल्या संबंधांच्या कृतीचं समर्थन केले आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ बिहार मध्ये सत्तांतर झाले आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजप सत्तेत आले तर बिहार मध्ये भाजपा-नितीश कुमार यांच्यामध्ये वितुष्ट आल्याने सत्ता गेली आहे. यावर एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीपण्णी करताना ' भाजप आपल्या असलेल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो. नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी उचलेले पाऊल हे शहानपणाचे असल्याचं' सांगत त्यांच्या कृतीचं समर्थन केले आहे.
शरद पवार यांनी जेपी नड्डा यांचं प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहिल. या वक्तव्याचा दाखला देत हीच तक्रार नितिश कुमार यांची असल्याचं म्हटलं आहे. बिहार पूर्वी महाराष्ट्रातही शिवसेनेसोबत दगाफटका झाला. पंजाब मध्ये अकाली दलासारखा मोठा पक्ष भाजपसोबत अनेक वर्ष होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा नेता त्यांची साथ देत होते. पण अकाली दल हा पक्ष आज जवळपास संपुष्टात आला आहे.
नितिश कुमार बिहार मधील जनतेचे नेतृत्त्व आहेत. महाराष्ट्रात जेव्हा सेना-भाजपा युती होती तेव्हा सेनेचे कमी आमदार कसे निवडून येतील याची काळजी भाजपाने घेतली होती. नितिश कुमार त्यापासून सावध झाले आणि वेगळं होण्याचा निर्णय घेतला. भाजपाने कितीही टीका केली तरीही नितिश कुमारांचं पाऊल हे शहाणपणाचं आहे. त्यांनी वेळीच धोका ओळखून खबरदारी घेणं पक्ष आणि राज्यासाठी फायद्याचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार आज बारामतीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. नक्की वाचा: Nitish Kumar Resigns: नीतीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; भाजपला धक्का देत RJD, काँग्रेस डाव्यांसोबत स्थापन करणार नवे सरकार .
आज नितिश कुमार पुन्हा 8व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. आता त्यांनी सत्तास्थापनेसाठी 7 पक्षांसोबत 'महागठबंधन' जाहीर केले आहे.