शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करू पाहत आहे, राजमाता अहिल्या देवी पुतळ्याच्या अनावरणावरून भूषण राजे होळकरांची प्रतिक्रिया

Tv9 मराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Sharad Pawar (Photo Credits: Getty)

जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून चांगलाच वाद पेटला आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार होते. मात्र, अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असे सांगत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आजच जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यातच आत होळकरांच्या वंशजांनीही शरद पवारांवर टिका केली आहे. शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करु पाहत असल्याचा आरोप भूषण राजे होळकर यांनी केला. Tv9 मराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता होळकर घराण्याचे वंशज असलेल्या भूषण राजे होळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. तसेच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असा संदेश भूषण राजे होळकर यांनी दिला आहे. जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून शरद पवार यांच्याकडून राजकारण होत आहे.हेदेखील वाचा- जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रकरणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं परस्पर अनावरण करणं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगलं महागात पडलंय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शरद पवार यांच्यावर गोपिचंद पडळकर यांनी भ्रष्टाचारी व जातीयवादी असल्याचा आरोप लावला आहे. त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये, या पुतळ्याचं अनावरण करू नये, अशी अनेकांची भावना होती. त्यामुळे स्वतः या पुतळ्याच्या अनावरणाला पोहचले होते. दरम्यान आज पुण्यामध्ये पत्रकार परीषदेमध्ये बोलाताना अजित पवारांनी देखील डिपॉजिट जप्त झालेल्या अशा व्यक्तीकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.