IPL Auction 2025 Live

Sharad Pawar Gets Death Threat: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवरुन अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी (Sharad Pawar Gets Death Threat) देण्यात आल्याचे समजते. शरद पवार यांना या आधीही अशा प्रकारे धमक्या आल्या आहेत.

Sharad Pawar (Photo Credit - Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवरुन अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी (Sharad Pawar Gets Death Threat) देण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र स्वत: माहिती देताना आपल्या व्हॉट्सअॅपवर धमकी आल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीबद्दल माहिती दिली. या वेळी खासदार सुप्रियाताईंसोबत प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार यांना एका ट्विटर हँडलवरुन अज्ञात व्यक्तीने धमकी दिली. या धमकीमध्ये 'भा*खाऊ तुझा दाभोलकर केला जाईल' अशा स्वरुपाची धमकी दिल्याचे पुढे आले आहे. शरद पवार यांना धमकी येणे दुर्दैवाची बाब आहे. लोकांमध्ये इतका द्वेश येतो कुठून? कोणीतरी एखादा व्यक्ती ट्विटर हँडलवरुन धमकी देतो. त्यानंतर त्या ट्विटला इतर लोक प्रतिक्रियाही देतात, हा काय प्रकार आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही? काय सुरु आहे हे सगळं? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (हेही वाचा, Sharad Pawar Gets Death Threat: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधुन अटक, आरोपीला गुरुवारी न्यायालयात करणार हजर)

ट्विट

व्हिडिओ

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही शरद पवार यांना अशा प्रकारची धमकी मिळाली होती. अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे फओन करुन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली होती. यावेळी सिल्व्हर ओकवर कर्तव्यासाठी तैनात असलेल्या फोन ऑपरेटरने मुंबई पोलिसांकडे तक्रार दिलीहोती. प्राप्त तक्रारीवरुन गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.