Sharad Pawar Faction: शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीसा, घ्या जाणून

त्यांनी या आमदारांना नोटीस धाडली असून उत्तरासाठी अवघ्या 48 तासांचा अवधी देण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी 5 जुलै रोजी व्हिप काढला होता. या व्हिपमध्ये यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत विधानसभा सदस्यांना बोलावण्यात आले होते.

Sharad Pawar vs Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Show Cause Notice to 12 MLAs of NCP: अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे पक्षात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटांनी आपापले नेते, प्रदेशाध्यक्ष, प्रवक्ते नेमले आहेत आणि बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळे सहाजिकच बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. शरद पवार गटानेही अशाच प्रकारचा बडगा उगारला आहे. पवार गटाने बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल 12 आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. पक्षप्रतोद जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकरवी या नोटीसा धाडण्यात आल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे प्रमुख व्हीप आहेत. त्यांनी या आमदारांना नोटीस धाडली असून उत्तरासाठी अवघ्या 48 तासांचा अवधी देण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी 5 जुलै रोजी व्हिप काढला होता. या व्हिपमध्ये यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत विधानसभा सदस्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक होते. मात्र, तरीही काही आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. परिणामी यातील 12 आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीशीला येत्या 48 तासात उत्तर द्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. (हेही वाचा, Social Media Troll Eknath Shinde Faction: सासुमुळे वाटणी केली अन् सासुच वाट्याला आली!, अजित पवार यांना अर्थखाते मिळाल्यावर शिंदे गट ट्रोल)

कोणत्या आमदारांना नोटीसा?

सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक प्रल्हाद चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे.

दरम्यान, या आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे. अनेक आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिले आहे. मात्र, दोन्ही बाजूला म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदारांचे समर्थन आहे याबाबत अद्यापही निश्चितता नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif